जातीयवाद संपवा
जातीवादामुळे आपण हे विसरतो की छत्रपती शिवराय यांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यामध्ये प्रत्येक जातीच्या लोकांचे योगदान होते. कित्येक युद्ध, मोहीम झाल्या ज्यामध्ये ब्राम्हण, मराठा, कुणबी, महार, चांभार, धनगर - सगळे खांद्याला खांदा लावून लढले! पण सध्याच्या राजकर्त्यांमुळे आपण आपल्यामधील ही एकता विसरून, स्वतःच्या जातीला महान सिद्ध करण्याची मूर्ख प्रक्रिया आरंभली आहे ती संपवणे फार गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या हयातीत आणि निधनानंतर पेशव्यांनी मराठा साम्राज्याला जी स्थिरता प्रदान केली त्यासाठी त्यांची जेवढी प्रशंसा करावी तितकी कमीच! जय भवानी, जय शिवराय जय शंभूराजे, जय पेशवे बाजीराव 🙏🚩