भक्त
भक्त होय आम्ही भक्त आहोत... भक्त आहोत त्या गोवर्धनधारी श्री कृष्णा चे... स्त्रीच्या सन्मानाची रक्षा करणारे... भक्त आहोत त्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचे... आदर्श जीवन जगणारे... भक्त आहोत त्या कैलासपती महादेवाचे... जगाच्या कल्याणासाठी विष पिणारे... भक्त आहोत त्या तुकोबा रायांचे... विठोबाच्या ध्यानात लीन होणारे... भक्त आहोत त्या गोमातेचे... जन्मभर जीचे दूध पिऊन जगतो... भक्त आहोत त्या नृसिंहाचे... आपल्या लोकांचे रक्षण करणारे... भक्त आहोत परशुरामाचे... अन्याय आणि अधर्मविरुद्ध लढणारे... भक्त आहोत भद्रकालीचे... दृष्टांचा संहार करणारे... भक्त आहोत त्या गंगेचे... सर्वांच्या पापांचे नाश करणारे... भक्त आहोत या भूदेवीचे... जगाचा भर आपल्या पाठीवर घेणारे... भक्त आहोत आम्ही हिंदू धर्माचे... जगतकल्याण साठी आयुष्यभर प्रयत्न करणारे 🙏🏻 लेखक - सुमेधराव मालंडकर