शिव अभंगवाणी

आम्ही रचलेली शिव अभंगवाणी ३०० वर्षांचे पारतंत्र्य, सहन करीत होता महाराष्ट्र, वाली त्याचा कोणी, उरला नाही भूवरी। मराठी वीर सरदार जे, सेवक होते मुघलांचे, आत्मसम्मान त्यांचा, नष्ट होता जाहला। प्रजा मात्र बिचारी, अत्याचारास कंटाळलेली, भीक मागत होती देवापाशी, एका रक्षकासाठी। १९ फेब्रुवारीच्या दिवशी, १६३० साली, दुर्ग शिवनेरीवरी, जाहले जन्म तयाचे। जिजाऊ जधावरावांची, शहाजीराजे भोसल्यांची, संतान होती ही, श्री शिवाजी नावाची। दादोजी, सोनोपंतांचे, ज्ञान घेऊनि सारे, जाणते झाले आपुले, बाळ शिवाजी राजे। वयाच्या १६व्या वर्षी, तोरणा गड घेऊनि, स्वराज्याचा आरंभ, केला महाराजांनी। राजगड, प्रतापगड, पुरंदर, जिंकले गेले यानंतर, महाराजांच्या वेगाला, कोण रोखू शकेल! फिरले डोके मुघलांचे, विजापूरच्या आदिलशाहचे, धाडले राजेंविरुद्ध, कपटी, क्रूर अफझलखानास। मंदिर त्याने फोडीले, पंढरपूर, तुळजापुराचे, प्रतापगडावर भेटुनी तुम्ही, खानाचा वध केला हो। जिंकला किल्ला पन्हाळा, हरविले रुस्तमजमानास, पण अडकलात वेढ्यात आपण, सलाबत सिद्दी जोहरच्या। बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे, निघालात आपण सुरक्षितपणे, गाठला...