स्वराज्य आणि बलिदान

स्वराज्य स्थापना आणि बलिदान - शिवकालीन आपणास हे तर माहीत आहेच की स्वराज्याची स्थापना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. पण त्या स्वराज्यासाठी किती रक्त वाहिले याची कल्पना बऱ्याच लोकांना माहीत नाही. आजचा हा लेख त्याच नरवीर सैनिकांना समर्पित आहे. स्वराज्याची इच्छा श्री शहाजी राजे भोसले यांच्या काळापासून मराठ्यांच्या मनात उद्भवली. पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खरे प्रयत्न चालू झाले ते श्री शिवाजी राजे भोसले यांच्या काळापासून. स्वराज्यस्थापनेच्या पुण्य कार्यात सर्वप्रथम बळी पडले ते "बाजी पासलकर". बाजी पासलकर हे मावळ मधल्या सर्व देशमुख-पटलांमध्ये मानाचे व्यक्ती होते. स्वराजयचे तोरण बांधण्यापासून ते शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तोरणा, राजगड, पुरंदर - हे सगळे किल्ले जिंकायला बाजी काका मैदानात उतरले होते. राजेंना शस्त्रविद्येचे आणि रण नीतीचे शिक्षण सुद्धा यांनीच दिले होते. १६४८ मध्ये आदिलशाहने फत्तेखानास मावळ प्रांतामध्ये धाडले. फत्तेखान याने जेजुरी जवळ बेलसर ला आपले तळ ठोकले आणि पुरंदरला वेढा घातला. बाजी पासलकर, कान्होजी जेधे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आदिलशाही ...