पेशवाई आणि मराठा साम्राज्य
पेशवे हे मराठा साम्राज्याचे प्रधान मंत्री होते. जशे मुघलांचे वझीर तशेच मराठ्यांचे पेशवे. स्वराज्याचे पाहिले छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज यांचे पेशवे श्री मोरोपंत पिंगळे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी नाशिकचा त्र्यंबकगड काबीज केला. अण्णाजी पंत दत्तो यांच्या दगाबाज प्रवृत्ती मुळे ब्राह्मण समाजास वाईट नाव आले परंतु त्याच अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्याच्या अकख्या जमिनीची मोजणी केली होती. केशवराव पंत यांनी लिहिलेली दंडनीती ही मराठा साम्राज्यातील न्यायव्यवस्थेचा पाया बनली. त्यानंतर संभाजी महाराजांचे राज्य आले. रामचंद्रपंत बावडेकर, निळोपंत पिंगळे या सारख्या पंत मंडळीने महाराजांच्या खांद्यास खांदा लावून मुघलांशी युद्ध लढले. शेवटी महाराजांना गणोजी शिर्के (मराठा) यानेच दगा देऊन मुघलांच्या हवाली केले. त्यावेळी महाराजांच्या सोबत असलेले निळोपंत पिंगळे ह्यांना हौतात्म्य प्राप्त झालं.
शंभू राजेंच्या मृत्यूनंतरच्या काळात पेशवे रामचंद्रपंत बावडेकर, प्रतिनिधी परशुरामपंत कुलकर्णी, प्रल्हादपंत निराजी या ब्राह्मण मंत्र्यांनी स्वराज्य सांभाळले. राजाराम महाराज जिंजी ला असताना यांनीच महाराष्ट्रात राहून लढा कायम ठेवला.
मुघलांनी १७०७ मध्य शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केले. त्यावेळी गादी ताराबाई राणीच्या हातात होती. बाळाजी विश्वनाथ भट यांनी शंकराजी नारायण, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर यासारखे सरदार शाहू महाराजांच्या पक्षात आणले. शेवटी त्यांनी धनाजी जाधवराव आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांना सुद्धा साताऱ्याच्या गादीचे वाफादर बनविले. बाळाजी भट पेशवे बनले आणि त्यानंतर लवकरच सैय्यद बंधूंना परास्त केले. १७१९ मध्ये दिल्लीस जाऊन त्यांनी स्वराज्याच्या चौथ आणि सरदेशमुखी चे अधिकार आणि त्यासोबतच राजमाता येसूबाईंना स्वराज्यात परत आणले.
बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यनंतर श्री बाजीराव बल्लाळ यांना पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली. ४१ युद्धात अपराजित ऐसा हा महावीर योद्धा! पाळखेड ला निझाम, बुंदेलखंड मध्ये मोहम्मद बांगश यांच्या सारख्या वीर मुघल सरदारांना बाजीराव पेशव्यानी पराजित केले आणि थेट दिल्ली लुटून साम्राज्यात परत आले. त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची कीर्ती दक्खन ते रोमशनपर्यंत पोचली. नदीर शाह सारखा क्रूर सेनानी सुद्धा बाजीराव पेशव्यांच्या भीतीमुळे दक्षिणेत नाही आला. ही उपलब्धी काही कमी आहे का!
बाजीराव पेशव्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या धाकट्या पुत्र रघुनाथराव याने मराठ्यांच्या भगवा अटकेपार फडकवला. १७६१ मध्ये पानिपत चे तिसरे युद्ध जाहले. त्यात पेशवेच हौतात्म्यास प्राप्त झाले. शिंदे-होळकर यांच्या सारखे मातब्बर सरदार तर तिथून पळून गेले. पण तरीही पेशवेच गद्दार ठरले!
१८५७ चा जेव्हा बंड झाला तेव्हा सुद्धा पेशवेच याचे नेतृत्व करत होते. तात्या टोपे, नाना साहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई - हे सगळे पेशवाई चेच होते. आणि त्यावेळी आपले देशभक्त मराठे काय करत होते? शिंदे सरकार तर इंग्रजांना साथ देत होते तर होळकर आपल्या वाड्यात निवांत होते. आणि तरी सुद्धा पेशवेच गद्दार ठरले!
सर्व पुरावे बघून तर असंच वाटत आहे की पेशवे हे मराठा साम्राज्याचे भक्षक नाही तर खरे रक्षक होते. आणि तरी सुद्धा त्यांनाच देशद्रोही ठरवून त्यांचा अपमान करणे ही आजच्या काळातील लोकांची खूप मोठी चूक आहे. खरा इतिहास वाचा आणि मग ठरवा की गद्दार कोण होते!
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩
लेखक - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment