Posts

Showing posts from January, 2021

आठवा

Image
  आठवा... आठवा उपाशी पोटी प्रवास करणारे ते मराठे, आठवा दिवस रात्र चकमकी लढणारे ते शूरवीर, आठवा बुराडी वर वीरमरण स्वीकारणारे दत्ताजीराव... आठवा पानिपतावर गोळी लागून पडणारे कोवळे विश्वासराव... आठवा आपल्या तोफांच्या बळावर अफगाण सैनिकांना भाजून काढणारा इब्राहिमखान... आठवा त्या यशवंतराव पवारांना ज्यांनी हत्तीवर चढून अताई खान यास मारले... आठवा बाजीराव आणि मस्तानीचा पुत्र समशेर... आठवा ते गुळाचे पाणी पिऊन लढणारे मराठा... आठवा गोविंदपंत बुंदेले यांना, ज्यांनी चारा धान्य पुरवता पुरवता वीरमरण स्वीकारले... आठवा पानिपतावर धारातीर्थी पडणारे पहिले सरदार बळवंतराव मेहेंदळे... आठवा मल्हारबाबांना ज्यांनी अनुभव आणि वयाच्या आधारावर सर्वांना सांभाळून घेतले... आठवा ते सदाशिवराव भाऊसाहेब, जे शेवटपर्यंत लढत लढत हुतात्मा झाले... आठवा तो १४ जानेवारी १७६१ चा दिवस... आठवा ती पानिपतची लढाई... आठवा मराठा दौलतीचा सर्वात पराक्रमी दिवास... पानिपत लेखन - सुमेधराव मालंडकर

स्वराज्याचे सूर्य

 मुघल आणि आदिलशाह च्या नाकी नऊ आणणारे स्वराज्यसंकल्पक शहाजी राजे,  शुरांमध्ये सगळ्यात शूर सरदार लखुजीराव जाधवराव, राजमाता, स्वराज्य जननी, मातोश्री जिजामबाई साहेब, स्वराज्यासाठी पहिलं बलिदान देणारे वीर बाजी पासलकर, पुण्याची घडी बसविणारे दादोजीपंत कोंडदेव, अनेक अडचण आणि शत्रूंवर विजय प्राप्त करणारे स्वराज्यसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज,  आपल्या सर्वस्वावर पाणी सोडणारे सरदार कान्होजी जेधे,  पोराचं लगीन सोडून कोंढाणा जिंकायला निघालेले सुभेदार तानाजी मालुसरे, खिंडीत छातीचा कोट करणारे बाजीप्रभू देशपांडे, वेडात दौडले वीर मराठे सात, त्या सात मराठ्यांचे प्रमुख प्रतापराव गुजर, धर्म आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे,  साल्हेर मध्ये वीरगतीला प्राप्त झालेले सूर्यराव काकडे, मित्रासाठी जगणारे आणि मित्रासाठी मरणारे कविराज कलश, स्त्रीशक्तीची धगधगती मशाल भद्रकाली महाराणी ताराबाई,  दर्यावर राज करणारे सरखेल कान्होजी आंग्रे, निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण सरसेनापती हंबीरमामा मोहिते,  औरंग्याच्या तंबूचा कळस कापणारे कालभैरव सेनापती संताजी घोरप...