स्वराज्याचे सूर्य
मुघल आणि आदिलशाह च्या नाकी नऊ आणणारे स्वराज्यसंकल्पक शहाजी राजे,
शुरांमध्ये सगळ्यात शूर सरदार लखुजीराव जाधवराव,
राजमाता, स्वराज्य जननी, मातोश्री जिजामबाई साहेब,
स्वराज्यासाठी पहिलं बलिदान देणारे वीर बाजी पासलकर,
पुण्याची घडी बसविणारे दादोजीपंत कोंडदेव,
अनेक अडचण आणि शत्रूंवर विजय प्राप्त करणारे स्वराज्यसंस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज,
आपल्या सर्वस्वावर पाणी सोडणारे सरदार कान्होजी जेधे,
पोराचं लगीन सोडून कोंढाणा जिंकायला निघालेले सुभेदार तानाजी मालुसरे,
खिंडीत छातीचा कोट करणारे बाजीप्रभू देशपांडे,
वेडात दौडले वीर मराठे सात, त्या सात मराठ्यांचे प्रमुख प्रतापराव गुजर,
धर्म आणि स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती शंभूराजे,
साल्हेर मध्ये वीरगतीला प्राप्त झालेले सूर्यराव काकडे,
मित्रासाठी जगणारे आणि मित्रासाठी मरणारे कविराज कलश,
स्त्रीशक्तीची धगधगती मशाल भद्रकाली महाराणी ताराबाई,
दर्यावर राज करणारे सरखेल कान्होजी आंग्रे,
निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण सरसेनापती हंबीरमामा मोहिते,
औरंग्याच्या तंबूचा कळस कापणारे कालभैरव सेनापती संताजी घोरपडे,
मुघलांना सळो की पळो करून सोडणारे धनाजी जाधवराव,
राजमाता येसूबाई यांना सोडवून आणणारे पेशवे बाळाजी विश्वनाथ,
४१ युद्ध जिंकणारे अजेय अपराजित श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव बल्लाळ,
अटकेपार भगवा फडकवणारे दादासाहेब उर्फ पेशवे राघोबादादा भरारी,
पानिपतच्या मैदानावर आपलं रक्त सांडणारे सर्व सरदार,
मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बसविणारे सरदार महादजी शिंदे,
१८५७ मध्ये वीरभद्राचा रूप घेतलेले सेनापती तात्या टोपे
इंग्रजांशी भिडलेली साक्षात भैरवी - राणी लक्ष्मीबाई!
ह्या सगळ्यांनीच घडवला आहे आमच्या मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास 🚩
असा पराक्रमी आणि निष्ठावंत इतिहास आणखी कोणाचा असेल तर दाखवा! 🚩
हर हर महादेव🚩
Comments
Post a Comment