आठवा
आठवा...
आठवा उपाशी पोटी प्रवास करणारे ते मराठे,
आठवा दिवस रात्र चकमकी लढणारे ते शूरवीर,
आठवा बुराडी वर वीरमरण स्वीकारणारे दत्ताजीराव...
आठवा पानिपतावर गोळी लागून पडणारे कोवळे विश्वासराव...
आठवा आपल्या तोफांच्या बळावर अफगाण सैनिकांना भाजून काढणारा इब्राहिमखान...
आठवा त्या यशवंतराव पवारांना ज्यांनी हत्तीवर चढून अताई खान यास मारले...
आठवा बाजीराव आणि मस्तानीचा पुत्र समशेर...
आठवा ते गुळाचे पाणी पिऊन लढणारे मराठा...
आठवा गोविंदपंत बुंदेले यांना,
ज्यांनी चारा धान्य पुरवता पुरवता वीरमरण स्वीकारले...
आठवा पानिपतावर धारातीर्थी पडणारे पहिले सरदार बळवंतराव मेहेंदळे...
आठवा मल्हारबाबांना ज्यांनी अनुभव आणि वयाच्या आधारावर सर्वांना सांभाळून घेतले...
आठवा ते सदाशिवराव भाऊसाहेब,
जे शेवटपर्यंत लढत लढत हुतात्मा झाले...
आठवा तो १४ जानेवारी १७६१ चा दिवस...
आठवा ती पानिपतची लढाई...
आठवा मराठा दौलतीचा सर्वात पराक्रमी दिवास... पानिपत
लेखन - सुमेधराव मालंडकर
Comments
Post a Comment