असावे तर कोणासारखे
पिता असावे शहाजी राजेंसारखे,
लांब राहून सुद्धा मुलाच्या कर्तुत्वास साथ देणारे...
आई असावी जिजाऊ मासाहेबांसारखी,
संस्कार, शिक्षण देऊन छत्रपती घडवणारी...
पुत्र असावे धर्मवीर शंभुराजेंसारखे,
वडिलांचा शब्द राखून त्यांचं स्वराज्य सांभाळणारे...
मामा असावे हंबीरराव मोहितेंसारखे,
सकख्या भाच्याला सोडून स्वराज्याशी निष्ठावंत राहणारे...
भाऊ असावे राजाराम महाराजांसारखे,
भरत सारखं भावाच्या निधनानंतर राज्य चालवणारे...
राणी असावी तर ताराराणी सारखी,
विपरीत परिस्थितीत शत्रूच्या नाकी नऊ आणणारी...
मित्र असावे तर कवी कलश सारखे,
मित्रांसोबत स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे...
पंडित असावे गागाभट्ट सारखे,
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपती यांचा राज्याभिषेक करणारे...
सासरे असावे मल्हारराव होळकरांसारखे,
समाजाच्या विरुद्ध जाऊन विधवा सुनेला सती जाण्यापासून रोकणारे...
बहीण असावी राणू अक्कांसारखी,
भावाच्या प्रत्येक कार्यात साथ देणारी...
पत्नी असावी येसूबाई साहेबांसारखी,
पतीच्या सुखदुःखात कायम साथ देणारी...
पेशवे असावे थोरले बाजीराव पेशव्यांसारखे,
छत्रपतींचा मान राखून राज्यविस्तार करणारे...
सेनापती असावे संताजीराव घोरपडे सारखे,
थेट छावणीत घुसून बादशहाच्या तंबूचे कळस कापणारे...
निष्ठा असावी ती मुरारबाजी सारखी,
शत्रूने धन-दौलतीचं आमिष दाखवून सुद्धा त्याकडे ढुंकूनही न पाहणारी...
न्यायप्रिय असावे रामशास्त्री सारखे,
प्रधानास न घाबरून, त्याच्या विरुद्ध देहांतची शिक्षा सूनवणारे...
हिम्मत असावी तर दत्ताजी शिंदेंसारखी,
मारताना सुद्धा ताठ मानेनं शत्रूला प्रत्युत्तर देणारी...
आणि राजे असावे तर फक्त श्री शिवछत्रपती सारखे,
प्रजेला स्वतःच्या परिवरसारखे जपणारे...
जय भवानी
जय शिवराय
लेखक - सुमेधराव मालंडकर
👍💐
ReplyDelete