महाराष्ट्र
महाराष्ट्र
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र...
शंभुराजेंच्या बलिदानाने पावन झालेला महाराष्ट्र...
बाजीराव पेशवे यांची घोडदौड पाहिलेला महाराष्ट्र...
तानाजीराव-बाजीप्रभू यांच्या पराक्रमाचे गीत गाणारा महाराष्ट्र...
तुकोबा-ज्ञानोबा यांची अभंगवाणी ऐकून पवित्र झालेला महाराष्ट्र...
मराठा साम्राज्याने सुशोभित महाराष्ट्र...
रायगड सारखा भक्कम महाराष्ट्र...
गजाननाच्या आशीर्वादात नांदत राहणारा महाराष्ट्र...
शाहू-आंबेडकर यांच्या समाजकल्याणाची कर्मभूमी असलेला महाराष्ट्र...
चित्रपटसृष्टीचे जनक देणारा महाराष्ट्र...
देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र...
बेधुंद समुद्रावर राज करणारा महाराष्ट्र...
कुसुमाग्रज-पु.ल. चे साहित्य वाचणार महाराष्ट्र...
देशातील पहिली महिला डॉक्टर देणारा महाराष्ट्र...
वसंतदादा, बालगंधर्व चे गीत ऐकणारा महाराष्ट्र...
सह्याद्रीच्या कड्यांवरून शत्रूवर नजर ठेवणारा महाराष्ट्र...
विठोबाच्या वरीने सजलेला महाराष्ट्र...
गोदावरी-कृष्णेच्या पाण्याने भिजलेला महाराष्ट्र...
अजिंठा-वेरूळ ची भव्यता असलेला महाराष्ट्र...
देशाच्या रक्षणासाठी तत्पर असलेला महाराष्ट्र...
अटकेपार भगवा फडकवणारा महाराष्ट्र...
या जगात आपली विलक्षण ओळख बनवणारा महाराष्ट्र...
लेखक - सुमेधराव मालंडकर
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
जय महाराष्ट्र 🚩
Comments
Post a Comment